पालावरच्या शाळेतील ११ विद्यार्थी बेपत्ता
By Admin | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-30T00:45:06+5:302015-12-30T00:45:06+5:30
वर्धा जिल्ह्यातील जाम येथील पालवारच्या ५२ विद्यार्थी असलेल्या शाळेतील अकरा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून कुटुंबियांसह बेपत्ता झाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे.

पालावरच्या शाळेतील ११ विद्यार्थी बेपत्ता
वरोरा (चंद्रपूर) : वर्धा जिल्ह्यातील जाम येथील पालवारच्या ५२ विद्यार्थी असलेल्या शाळेतील अकरा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून कुटुंबियांसह बेपत्ता झाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे.
या शाळेतील भटकंती करणारी कुटुंबे काही महिन्यांपूर्वी वरोरा शहरानजिक थांबली होती. त्यांच्याशी वरोरा शिक्षण विभागाने समन्वय साधत त्यांच्या ५२ मुला-मुलींसाठी पालावरची शाळा सुरू केली. ही शाळा एक महिना चालली. या शाळेला अनेक अधिकारी व मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाने कौतुक केले होते. (प्रतिनिधी)