१३ वर्षांच्या एका आदिवासी मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातीलपालघर येथे घडली आहे. पोलिसांनी आज या घटनेची अधिक माहिती दिली. तसेच अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अहिल्यानगर येथील वर आणि त्याच्या कुटुंबीयांसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आजोबांनी सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर येथील एका व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून दिलं होतं. त्यानंतर तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आलं. एवढंच नाही तर नवऱ्या मुलग्याच्या आईवडिलांनीही तिचा प्रचंड मानसिक छळ केला.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अल्पवयीन मुलीचं बळजबरीने लग्न लावणं, तस्करी आणि वारंवार लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली या मुलीच्या पतीसह एकूण ५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा अनेक न्यायिक क्षेत्रांत घडलेल्या असल्याने आम्ही या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरोधात तत्काळ कारवाई व्हावी यासाठी तपासामध्ये समन्वय साधत आहोत. या प्रकरणी भादंवि, पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Web Summary : In Palghar, a 13-year-old tribal girl was forced into marriage and raped. Police filed a case against the husband and his family, totaling five people, under POCSO and other relevant laws for the crime.
Web Summary : पालघर में 13 वर्षीय आदिवासी लड़की को जबरन शादी के बंधन में बांधकर बलात्कार किया गया। पुलिस ने पति और उसके परिवार सहित कुल पांच लोगों के खिलाफ पोक्सो और अन्य संबंधित कानूनों के तहत मामला दर्ज किया है।