शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 18:26 IST

यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता..

ठळक मुद्देकेवळ ५० लोकांच्या उपस्थितीत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे झाले होते प्रस्थान

देहूगाव- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या आषाढीवारी पालखी सोहळ्याची मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टंस राखत भक्तीमय वातावरणात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगता झाली. आषाढी एकादशी असूनही आज मंदिरात मात्र संपुर्णपणे शुकशुकाट होता. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते.      यंदा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांचा पायीवारी पालखी सोहळा रद्द झाला होता. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान १२ जून रोजी करण्यात आले होते. प्रस्थानानंतर या पादुका येथील भजनी मंडपातच ठेऊन वारीच्या वाटचालीतील नित्य उपक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सुरू ठेवले होते. शासनाच्या परवानगीनंतर या पादुका आषाढ दशमीच्या दिवशी शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या एसटी बसने ३० जून रोजी दुपारी पंढपूरला नेण्यात आल्या होत्या. पंढरपूर येथे एकादशीच्या दिवशी पादुकांना चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणा झाली.  बारशीच्या दिवशी देवभेट घेऊन पादुका २ जुलैला देहूत दाखल झाल्या होत्या. यानंतर येथील भजनी मंडपातच वाटचालीचे कार्यक्रम काही लोकांमध्ये पार पाडले जात होते. 

     आज आषाढी एकादशीनिमित्त प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. पहाटे साडेचार वाजता शिळामंदिराची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मीनी मंदिरात संस्थानचे अध्यक्षांसह पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्थ संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली. पहाटे साडे पाच वाजता वैंकुठगमन मंदिरात विश्वस्थांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

सकाळी १० ते १२ वाजेपर्यत भजनी मंडपात भजन करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनीमंडपातुन बाहेर काढण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा दरम्यान, पंचपदी, नित्य अभंग व गौळण व आरती करण्यात आली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा संपवून पालखी पादुकांसह भजनीमंडपात आणण्यात आली. येथे पालखी सोहळा प्रमुख,संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थयांच्या हस्ते सेवेकरी यांना मानाचा श्रीफळ प्रसाद देवून सन्मान करण्यात आला.  संस्थानच्या वतीने महाप्रसादानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.फोटो स्वतंत्र पाठविले आहेत.

टॅग्स :dehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस