पाकिस्तानी ब्रँडना मनसेचा विरोध
By Admin | Updated: April 19, 2017 02:28 IST2017-04-19T02:28:35+5:302017-04-19T02:28:35+5:30
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी ब्रँडच्या वस्तूंच्या विक्रीला विरोध दर्शविला आहे.

पाकिस्तानी ब्रँडना मनसेचा विरोध
मुंबई : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी ब्रँडच्या वस्तूंच्या विक्रीला विरोध दर्शविला आहे.
मंगळवारी परळ येथील पॅलेडियम मॉलमधील झारा शोरूमची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. गेल्या काही दिवसांपासून झारा शोरूममध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मनसेला मिळाली होती. त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी शाखेने मालाड इनॉर्बिट, फिनिक्स कुर्ला आदी झाराचे शोरूम असलेल्या मॉलना पत्र पाठवून पाकिस्तानी कपडे न विकण्याचा इशारा दिला होता. तरीही ही विक्री न थांबल्याने आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पॅलेडियम मॉलमधील झाराच्या शोरूमवर धडक दिली. (प्रतिनिधी)