पवनी तालुक्यातील मेंढेगाव शिवारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने वाहनचालकाला पकडून कारवाई केली. ...
रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रूग्णाच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ही जटील शस्त्रक्रिया तीन तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली असून या रूग्णाला जीवनदान मिळाले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लक्ष हॉस्पीटलम ...
शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसा ...
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंद पुकारला होता. शहरातील चौकाचौकात विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करून वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन दडपून काढत आंदोलन करणा ...
प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. ...
शेतकऱ्यांना पेरणीसाठी कृषिकर्जाची गरज आहे. सध्या १८ टक्केच कर्जवाटप झाल्याने गती वाढवावी व येत्या ३० जूनपर्यंत सर्व बँकांनी उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांवर कर्जवाटप करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी २५ जूनच्या आढावा बैठकीत सर्व बँकांना दिले ...
पावसाअभावी वणी शहरातून वाहणारी निर्गुडा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास वणी शहरात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ...
चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडण ...
स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीम ...