तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. ...
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आणि मोहन मते मित्र परिवाराच्या परिश्रमातून साकारलेला ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ हा आगळावेगळा कार्यक्रम नागपुरातील तरुणाईचे स्फुल्लिंग चेतविणारा ठरला. अभिजित धर्माधिकारी, अंकित अरोरा आणि आशिष गोस्वामी या ध्येय ...
येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...
धम्म चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्थांचा सत्कार सोहळा येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद बचत भवनात पार पडला. तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पत्रकार विजय डांगे अध्यक्षस्थानी, तर चंदन तेलंग स्वागताध्यक्ष होते. ...
गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला. ...
आवश्यक कागदपत्रे नसलेल्या आॅटोरिक्षांवर वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाने शहरात शनिवारी धडक मोहीम राबवून २५ आॅटोरिक्षांवर कारवाई केली. याविरुद्ध आॅटोरिक्षा चालक-मालक व प्रहार आॅटोरिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. ...
जिल्ह्याला अनेक वर्षानंतर आयपीएस दर्जाचे अपर पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नुरूल हसन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली. शनिवारी दुपारनंतर शहरातील चारही प्रमुख पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील ठाणेदार व कर्मचा ...
लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेल्या अपयशाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उदासीन मानसिकताच कारणीभूत आहे. भाजपला रोखणे हीच रिपब्लिकन पक्षाची मुख्य भूमिका आहे. तेव्हा लोकसभा निवडणुकीत झालेली चूक येत्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी ...