Maharashtra Police Squad first in Indian Police Duty | महाराष्ट्र पोलिसांचा डंका; भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देशात अव्वल 
महाराष्ट्र पोलिसांचा डंका; भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देशात अव्वल 

ठळक मुद्दे १२ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी

पुणे : लखनौ येथे झालेल्या ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस पथकाने १२ पदके मिळवत देशात अव्वल कामगिरी बजावून सर्वसाधारण विजेतेपद पदकाविले आहे़. ४० स्पर्धकांच्या या संघाने  ५ सुवर्ण, ३ रजत आणि ४ कांस्य पदके मिळविली आहे़. भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांना प्रथमच इतके घवघवीत यश मिळाले आहे.

या स्पधेर्साठी देशभरातील ३० पोलीस दलातील १२५० स्पर्धकांनी भाग घेतला होता़. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक नैपुण्य व कौशल्य वाढविण्यासाठी अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्याच्या धर्तीवर २००२ पासून राज्य पोलिस कर्तव्याचे आयोजन होते़. यामध्ये विज्ञान शास्त्राची तपासात मदत, घातपात विरोधी तपासणी स्पर्धा, संगणक स्पर्धा, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, श्वान स्पर्धा या विभागामध्ये स्पर्धा घेतली जाते. यात निवड झालेल्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम रामटेकडी येथील राज्य गुप्तवार्ता प्रबोधनी येथे करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी संघाची निवड करण्यात आली होती. या संघात राज्य पोलिस दलाच्या विविध विभागातील कर्मचारी सहभागी होते. 

संघाने ही कामगिरी, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली टिम मॅनेजर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पल्लवी बर्गे, ज्योती क्षीरसागर, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी केली. स्पधेर्तील विजेते सायंटिफिक अडस टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारात क्रिमिनल लॉ, क्राईत इन्व्हेस्टिगेशन आणि

प्रोसिजर या प्रकारात अमोल पवार -सुवर्ण- सहायक निरीक्षक, लातूर, नितीन गिते - रजत, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर आणि राहुल खटावकर - कास्य, सहायक निरीक्षक, औरंगाबाद शहऱ

फॉरेन्सिक सायन्स : नितीन गिते -कास्य, राखी खवले, पोलीस हवालदार, सीआयडी, अतुल जाधव, पोलीस शिपाई, सातारा, कॉम्प्युटर अवेरनेस स्पधार् : १) विजय कुंभार -सुवर्ण, सहायक फौजदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे, २) हनुमंत भोसले -रजत, पोलीस नाईक, सातारा़ पोलीस व्हिडिओग्राफी समीर बेंदगुडे - रजत,  पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस दल १ तसेच उपविजेतेपदाची ट्रॉफी, अंट्री सॅबोटेज चेक : रुम सर्चमध्ये अनिल साळुंखे, हवालदार, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी व अमोल गवळी पोलीस शिपाई, सातारा यांना कास्य पदक मिळाले आहे़


Web Title: Maharashtra Police Squad first in Indian Police Duty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.