येथील नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी दिव्यांग सामाजिक संघटनेने तीन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती. ...
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शास ...
नागपूर सुधार प्रन्यासचे महानगर पालिकेत विलिनीकरण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांनी वेगाने करावी. शासनाने दिलेल्या मर्यादेपर्यंत हे विलिनीकरण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यासाठी २८१ कोटी रुपये मंजूर व्हावे याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमक्ष मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती ...
वाढत्या लोकसंख्येला राष्ट्रीय आणीबाणी समजून यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे आहे. याकरिता एका आयोगाची स्थापना करण्याची मागणी राज्यसभेत खा. डॉ. विकास महात्मे यांनी शून्य तासात केली. ...
कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली. ...