ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपली हद्द सुद्धा माहीत नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जि ...
तिरळे कुणबी समाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामा ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य यो ...
समाजव्यवस्थेत अद्याप मागास जाती-जमातीतील कुटुंबांना जगण्याचा आधार शोधावा लागत आहे. वर्तमान स्थितीत सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, बहुरूपी समुदायातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर हंगामी बहुआयामी व्यवसायाची उभारणी केली आहे. यातून ...
गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले. ...
कुलूपबंद असलेल्या मंदिरांना टार्गेट करून मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचे मौल्यवान साहित्य जप्त केले आहे. शिवाय, चोरट्याने एकूण चार गुन्ह्याची क ...
मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवा ...
अयोध्यानगर मेन रोडवरील गडरच्या चेंबरमधून गेल्या १० दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. गडराच्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारीही केल्या होत्या. नगरसेवकांनी स्वत: घटनास्थळाल ...