मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुकुंज (मोझरी) येथून गुरूवारी महाजनादेश यात्रा प्रारंभ झाली. यानिमित्ताने जिल्हाभरात पोस्टर, होर्डिंग्ज लागले आहेत. मात्र, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होर्डिंग्जमध्ये हेतूपुरस्सर टाळण्यात आली. ...
वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारली आहे. ही राज्यातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले. ...
प्रशासनाचा महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते. शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविण्याची व समन्वयाची जबाबदारी महसूल विभागावरच आहे. ...
जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्यभर महाजनादेश यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा शनिवार ३ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. भंडारा व तुमसर येथे सभेचे आयोजन केले आहे. ...
भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी कुपोषण निर्मुलन आवश्यक आहे. शासन विविध मार्गानी कुपोषण मुक्तीचा प्रयत्न करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुर्नसर्व ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ३ हजार २२० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हे शिबिर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ...
चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. ...
येथील मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शंकरपूर व परिसरातील विविध ठिकाणची घरे व काही लोकांच्या गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली असून अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने एकाही घटनेत जीवितहानी झालेली नाही. ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातच संततधार पाऊस बरसत आहे. इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. चंद्रपूर शहरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. या नदीकाठावर व पूरबुडित क्षेत्रात अनेक नागरिकांचा मागील अनेक वर्षांपासून रहिवास ...