नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प ...
अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. ...
आरमोरी येथील बर्डी भागातील वडसा व ब्रह्मपुरी मार्गावर नेहमीच मोकाट जनावरे बसून असतात. सदर दोन्ही मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जनावरांना वाहनांची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास जनावर मालक वाहनमालकांना ...
जिल्ह्याच्या १२ तालुक्यात सहा महसुली उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्येक गावात एक पोलीस पाटील असावा, असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटलांची जवळपास १ हजार ५१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९५० व ...
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात विडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात गोंदिया, जबलपूर आणि कामठी येथील तीन नामांकित कंपन्याचे विडी कारखान ...
भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता ...
कैलास किसन देशमुख यांचे निलज येथे घर आहे. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यामुळे त्यांनी घरालगतच एका कौलारू घरात तात्पुरता आश्रय घेतला आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वयंपाकानंतर त्यांची ...
दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. ...
आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ् ...
शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफ ...