आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या ...
३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात ...
वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाण ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकाना ...
गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भ ...
गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केल्या जाते. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेणे अपेक्षीत असते. परंतु तालुक्यात या विकासकामाचे ठेकेदार लोकप्रतिनिधीच बनल्याने विकासकामात अनियमितत ...
गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभाग ...
२३ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. तरी महामंडळाचे दररोज सुमारे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसत आहे. मार्च देय एप्रिल २०२० चे २५ ...
ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल ...
पऱ्हे१५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्यांची रोवणी करण्यात येते.यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे नियोजित वेळेतच भरले. पण अगदी हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखविला . जून व जुलै या संपल ...