पद्मावतीत इफ्तार पार्टी उत्साहात

By Admin | Updated: June 28, 2016 01:04 IST2016-06-28T01:04:20+5:302016-06-28T01:04:20+5:30

पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे पद्मावती येथील मोगल वसाहत येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

Padmavasti Iftar party enthusiasm | पद्मावतीत इफ्तार पार्टी उत्साहात

पद्मावतीत इफ्तार पार्टी उत्साहात


सहकारनगर : स्वराज प्रतिष्ठान, शेरे हिंद यंग सर्कल लब्बेक ग्रुप, पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे पद्मावती येथील मोगल वसाहत येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास डॉ. विश्वजित कदम, नगरसेवक अभय छाजेड, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, सतीश पवार, नरेंद्र व्यवहारे, हरीश यादव, ऋषी भुजबळ, सागर खोत हे मान्यवर उपस्थित होते.
रमजान पवित्र महिन्यात रोजा, तराबीच्या नमाजबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महेश वाबळे व मनीषा वाबळे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद माहेश्वरी व आभार आवेश मन्सूरी यांनी मानले.

Web Title: Padmavasti Iftar party enthusiasm