वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:37 IST2018-05-15T09:19:17+5:302018-05-15T11:37:31+5:30
पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले.

वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं निधन
पालघर: डहाणू/बोर्डी -
वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे 'पद्मश्री' जिव्या म्हशे यांचं आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले. डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कलमीपाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पवनी, विठ्ठल, सदाशिव आणि बाळू ही तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचवण्यात मशे यांचा मोलाचा वाटा होता.
(Maharashtra Day: वारली संस्कृती सातासमुद्रापार नेणारे जिव्या)