शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:46 IST

विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

लातूर : विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ क्षेत्र संघचालक राहिलेल्या ८० वर्षीय डॉ. कुकडे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. 

मूळचे पुणे येथील डॉ. अशोक कुकडे यांनी १९६४ साली आरोग्य सेवेसाठी लातूर निवडले. तत्पूर्वी डॉ. कुकडे यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज येथे झाले. ते एमबीबीएसला सुवर्णपदक विजेते होते. अन् एमएसमध्येही सर्वप्रथम आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात सेवा देण्याचा निश्चय डॉ. कुकडे यांनी केला. त्यांच्यासोबत पत्नी डॉ. ज्योत्स्ना कुकडे, डॉ. भराडिया, डॉ. आलूरकर लातूरला आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. ज्याचा विस्तार विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र असा झाला आहे.

सामाजिक जाणिवेतून संघटित वैद्यकीय सेवा पुरविण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानने लातूरमध्ये केला. याच दरम्यान डॉ. कुकडे यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र संघचालक म्हणून काम पाहिले.  देशभर दौरे केले. अलिकडच्या काळात कॅन्सर उपचारही ग्रामीण भागात अत्यंत कमी दरात मिळावेत, यासाठी डॉ. कुकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कॅन्सर केअर सेंटर उभारले. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय उभारलेले देशातील एकमेव कॅन्सर केअर सेंटर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानमुळे ग्रामीण भागात सेवेत आले. 

डॉ. अशोक कुकडे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती या शिक्षण संस्थांचेही अध्यक्षपद भूषविले असून, आजही सामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी ते तत्पर आहेत. 

रिटायर बट नॉट टायर्ड : अनघा लव्हळेकरडॉ. अशोक कुकडे व डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांची मुलगी अनघा लव्हळेकर या पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत मानसशास्त्र विभाग प्रमुख आहेत. वडिलांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार असल्याची वार्ता कळल्यानंतर अनघा आनंदी झाल्या. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, आई-वडील आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी सेवेचा ध्यास घेऊन लातूर आणि ग्रामीण भागात सामान्यांपासून सर्व स्तराच्या लोकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. वडिलांचे जन्मगाव पुणे. जन्म २२ डिसेंबर १९३८ चा. त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली. एकार्थाने ते रिटायर झाले असले तरी सेवावृत्तीत ते टायर्ड नाहीत, अर्थात् थकलेले नाहीत. 

कार्याचा बहुमान; अत्यानंद झाला : डॉ. ज्योत्स्ना कुकडे डॉ. अशोक कुकडे यांच्या अविरत कार्याचा हा बहुमान आहे. पद्म पुरस्काराने होणारा सन्मान हा अत्यानंदाचा क्षण आहे. स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. मात्र सेवावृत्तीचा हा यथोचित गौरव असून, यामुळे अनेकांना सेवाभाव जपण्याची प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी दिली.

टॅग्स :laturलातूर