शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Padma Awards 2025: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे दिवंगत नेते मनोहर जोशींना पद्म भूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 22:42 IST

Padma Awards 2025: यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये अशोक मामा म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तसेच माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मनोहर जोशी हे १३ व्या लोकसभेचे अध्यक्षही होते. १९९५ ते ९९ या काळात जोशी यांनी युतीचे मुख्यमंत्री पदही सांभाळले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठेपायी ते अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी प्रामाणिक राहिले. ठाकरे गटाच्या या दिवंगत नेत्याला यंदा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

याचबरोबर भाजपाचे दिवंगत नेते सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशीलकुमार मोदी हे बिहारचे नेते होते. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपद, राज्यसभेचे सदस्यत्वपद भुषविले आहे. त्यांचे १३ मे २०२४ मध्ये निधन झाले होते.

पद्मविभूषण... - दुव्वुर नागेश्वर रेड्डी (वैद्यक)- न्यायाधीश (निवृत्त) जगदीश सिंह खेहर (सार्वजनिक व्यवहार)- कुमुदिनी रजनीकांत लाखिया (कला)- लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला)- एम. टी. वासुदेवन नायर (साहित्य आणि शिक्षण) मरणोत्तर- ओसामु सुझुकी (व्यवसाय आणि उद्योग) मरणोत्तर- शारदा सिन्हा (कला) मरणोत्तर

पद्मभूषण...

- ए सूर्य प्रकाश (साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता)- अनंत नाग (कला)- बिबेक देबरॉय (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण- जतीन गोस्वामी (कला)- जोस चाको पेरियाप्पुरम (औषध)- कैलाशनाथ दीक्षित (इतर - पुरातत्व)- मनोहर जोशी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार- नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी (व्यापार आणि उद्योग)- नंदमुरी बालकृष्ण (कला)- पीआर श्रीजेश (क्रीडा)- पंकज पटेल (व्यापार आणि उद्योग)- पंकज उधास (मरणोत्तर) कला- राम बहादूर राय (साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता)- साध्वी ऋतंभरा (समाजकार्य)- एस अजित कुमार (कला)- शेखर कपूर (कला)- सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार- विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी) 

टॅग्स :Manohar Joshiमनोहर जोशीpadma shri awardsपद्मश्री पुरस्कारShiv Senaशिवसेना