शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज; दिवाळीपूर्वी होणार मदतीचे वाटप, मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:04 IST

या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यात जून ते  ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या फेरउभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार  जिरायत आणि बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रुपये (२ हेक्टरपर्यंत)तर फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये (२ हेक्टरपर्यंत) मदत देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम पोहोचती करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

या संकटात राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.  दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना ही मदत पोहचवावी असे निर्देश आपण प्रशासनाला दिले आहेत.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून सूड घेतला आहे.      - देवेंद्र फडणवीस,     विरोधी पक्षनेते

निधीतून कामेअतिवृष्टीने रस्ते, पुल, वीजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमीनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जातील. मृत व्यक्तीच्या वारसांना तसेच पशुधन मृत्युमुखी पडले असेल आणि घर पडलेले असेल तर निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. 

केंद्राने मदतीचा हात आखडलाजीएसटीची थकबाकी, केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा यापोटी राज्याचे हक्काचे ३८ हजार कोटी रुपये केंद्राकडे प्रलंबित आहेत. हा हक्काचा निधी देण्याबाबतही केंद्राला पत्रे व स्मरणपत्रे पाठवण्यात आली तरी केंद्राकडून  हा निधी मिळालेला नाही. चक्रीवागळग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठीच्या प्रस्तावावरही कुठलाच प्रतिसाद नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी तोफ डागली.

शेती व घरांसाठी मदत        ५५०० कोटीरस्ते, पूल                                              २६३५ कोटीनगरविकास                                            ३०० कोटीमहावितरण/ऊर्जा                                     २३९ कोटीजलसंपदा                                               १०२ कोटीग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा                       १००० कोटी 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीfloodपूरRainपाऊस