शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:42 IST

ओवेसी हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत युती कायम असणार असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्दी पत्रक काढून केला होता. मात्र जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम असल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता यावर असदुद्दीन ओवेसी यांनी खुलासा करत, जलील यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा अधिकृत निर्णय असल्याचा जाहीर केले आहे. ते पत्रकार परिषेदत बोलत होते. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. त्यातच आता ओवेसी यांनी सुद्धा युती तुटली असल्याचा खुलासा केला आहे. जलील हे महाराष्ट्राचे  प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. एक प्रकारे ओवेसीनी आंबेडकर यांना धक्काच दिला आहे.  

ओवेसी हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत युती कायम असणार असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला होता. मात्र आता ओवेसी यांनी जलील यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितल्याने वंचित आणि एमआयएम यांची युती तुटली असल्याचे स्पष्ट  झाले  आहे. त्यामुळे यावर आता प्रकाश आंबेडकर हे काय प्रतिकिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.