आगीमुळे एमटीएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Published: January 20, 2017 05:08 AM2017-01-20T05:08:25+5:302017-01-20T05:08:25+5:30

टेलिफोन केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील एमटीएनएल सेवा दिवसभर विस्कळीत झाली.

Overloading of MTNL service due to fire | आगीमुळे एमटीएनएल सेवेचा बोजवारा

आगीमुळे एमटीएनएल सेवेचा बोजवारा

Next


मुंबई : वरळी येथील टेलिफोन केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील एमटीएनएल सेवा दिवसभर विस्कळीत झाली. एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेसह दूरध्वनी सेवेवर याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी वरळी परिसरातील विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट मुख्यालयांसह एमटीएनएलच्या रहिवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना याचा मोठा फटका बसला. सायंकाळी पाचनंतर सेवा पूर्ववत झाल्याचा दावा एमटीएनएलने केला. प्रत्यक्षात मात्र वरळीसह उर्वरित परिसरातील टेलिफोन आणि इंटरनेट सेवांचा रात्री उशिरापर्यंत बोजवारा उडाल्याचे चित्र होते. वरळी येथील टेलिफोन एक्सचेंजच्या कार्यालयात गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग खूप मोठी नसली तरी या आगीत एमटीएनएलच्या यंत्रणेची हानी झाली. वरळी एक्सचेंजलगतच्या परिसरासह गांधीनगर, वरळी नाका आणि लक्ष्मी पपन मार्गावरील टेलिफोन सेवेसह नेटसेवा ठप्प झाली होती. एमटीएनएलची यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सायंकाळ उजाडल्याने वरळीतल्या बहुतांशी कॉर्पोरेट मुख्यालयांसह उर्वरित कार्यालयांना याचा मोठा फटका बसला. सकाळपासून दुपारी ही सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असतानाच दुपारी चारनंतर या दोन्ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याचा दावा महानगर टेलिफोन निगम लिमिटेडकडून करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र सायंकाळीही गांधीनगर, वरळी, वरळी नाक्यासह लगतच्या परिसरातील टेलिफोन
सेवेत तांत्रिक अडचणी निर्माण
होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत होत्या. ग्राहकांना झालेल्या मनस्तापाबद्दल एमटीएनएलने दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Overloading of MTNL service due to fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.