वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो !

By Admin | Updated: September 9, 2014 04:48 IST2014-09-09T04:48:49+5:302014-09-09T04:48:49+5:30

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्‍चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे.

Over ten dams in Varahad overflow! | वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो !

वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो !

अकोला : दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्‍चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे. 
गत दोन दिवसापासून विदर्भात सर्वदूर पाऊस सुरू असून, नदी, नाले, ओढय़ांना पूर आला आहे. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांना या पावसाने दिलासा दिला असून, बुलडाणा जिल्हय़ातील दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. याच जिल्हय़ातील मस धरण १00 टक्के भरले असून, या धरणातून १0 से.मी. सांडवा वाहत आहे. याचा विसर्ग प्रतिसेकंद ५.७३ दलघमी असून, कोराडी धरणातून २५ सेमी सांडवा वाहत आहे. त्यामुळे या धरणातून प्रतिसेंकद ३४.५६ दलघमी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. 
अकोला जिल्हयातील काटेपूर्णा धरणाचा उपयुक्त जलसाठा २६.६१ दलघमी असून, या धरणाचा एकूण जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहाचला आहे. या धरणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात उपयुक्त जलसाठा २0.0६ दलघमी असून, या जलसाठय़ाची टक्केवारी ४८ आहे. याच तालुक्यातील निगरुणा धरणाचा जलसाठा ९८ टक्कय़ांवर पोहोचला आहे. मुर्तीजापूर तालुक्यातील उमा धरणाचा जलसाठा मात्र १९ टक्केच असून, दगडपारवा धरण अद्यापही शून्यावर आहे. आकोट तालुक्यातील पोपटखेड लघू पाटंबधारे प्रकल्पाचे दोन वक्रव्दार ५ सेमीने उघडण्यात आले आहेत. 

Web Title: Over ten dams in Varahad overflow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.