शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सगेसोयरे अधिसूचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती; छाननी करण्याचे काम सुरू, सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 06:30 IST

जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले.

मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या १० टक्के आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले असतानाच आता सगेसोयरे अधिसूचनेवर ८ लाखांहून अधिक हरकती आल्या आहेत. या हरकतींची छाननी तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती करणार आहे. त्यावर मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.   

विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्न विचारला. सगेसोयरे अध्यादेशावर आलेल्या हरकतींवर एक महिन्यात निर्णय घेण्यात येणार होता, त्याचे काय झाले. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र द्यावे, न्यायालयाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची आजही अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार, असे प्रश्न काळे यांनी विचारले. यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.  चर्चेत कपिल पाटील, अमोल मिटकरी, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.  

हैदराबाद गॅझेटच्या कॉपी मागवणार हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण पाहिजे तर हैदराबाद स्टेटच्या प्रमाणित कॉपी मागविलेल्या आहेत. हैदराबादच्या मुख्य सचिवांशी आपल्या राज्याच्या मुख्य सचिवांना बोलणी करायला सांगून त्या कॉपी मागवण्याचा प्रयत्न आहे, असेही देसाई म्हणाले. 

९ व्या शेड्युलचे संरक्षण द्या! मराठा आरक्षणाला ९ व्या शेड्युलचे संरक्षण दिले आहे का, त्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे का, असा प्रश्न कपिल पाटील यांनी विचारला. त्यावर बिहारने दिलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली जाईल. त्याचा अभ्यास आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती करेल, नंतर तो अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले. 

१ लाख ३६ हजार ६९० दाखले वितरित विशेष मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला तेव्हापासून आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६९० दाखले वितरित करण्यात आले आहेत तर २८ हजार ५०० दाखले प्रलंबित आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली.

‘ते’ ३६ गुन्हे मागे घेता येणार नाहीतआंदोलनादरम्यान ५ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर अशा व्यक्तींवर गुन्हे मागे घेतले जात नाहीत, असे धोरण आहे. याबाबत मनोज जरांगे यांनाही कळवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMaratha Reservationमराठा आरक्षणVidhan Parishadविधान परिषद