शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पेरण्या : मराठवाडा-विदर्भात चांगले चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 20:53 IST

गहू, मका, हरभऱ्याचे होणार भरघोस उत्पादन

ठळक मुद्देगेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम 

पुणे : अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे यंदा जलसाठे तृप्त झाल्याने रब्बीची पेरा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर असून, यंदा ५७ लाख ६४ हजार हेक्टरवर (१०१ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. हरभरा, गहू, मका या पिकांचे क्षेत्र वाढल्याने भरगोस उत्पादन होईल. गेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी झाली नव्हती. यंदा रब्बीचा पेरा जास्त झाला आहे. नाशिक विभागामधे रब्बीचे सरासरी क्षेत्र ४.३१ लाख हेक्टर असून, ५.२८ लाख हेक्टरवर, औरंगाबादमधे ७.७२ लाख हेक्टरवरुन साडेनऊ लाख हेक्टरवर आणि लातूर विभागातील क्षेत्र ६.४७ लाख हेक्टरवरुन ७.५६ लाख हेक्टरवर वाढले आहे. नागपूर विभागामधे ४.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोकणात २९ हजार हेक्टरवर, पुणे विभाग ११.८५ लाख हेक्टर आणि कोल्हापूर विभागात ४.४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, ११ लाख ६५ हजार ८१६ हेक्टरवर, मक्याची २ लाख ६७ हजार ३५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २२ लाख ७१ हजार ३१६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. करडई, जवस, तीळ आणि सुर्यफूल या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्यात ४० हजार हेक्टरपर्यंत घट झाली आहे. ------ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम राज्यात ज्वारी हे रब्बी हंगामाचे मुख्य पीक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. यंदा देखील त्यातील सातत्य कायम राहिले. ज्वारीचे क्षेत्र गहू, मका आणि हरभरा पिकाकडे वळत असल्याचे दिसून येते. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर (७१ टक्के) पेरणी झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती