शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास

By appasaheb.patil | Updated: July 23, 2019 13:04 IST

आषाढी यात्रा सोहळा : मध्य रेल्वेच्या चौतीस विशेष गाड्यांनी पूर्ण केल्या १२६ फेºया

ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ७ ते १६ जुलै या दहा दिवसात विविध गाड्यांसह विशेष गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडल्या होत्यावारकºयाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या होत्याआषाढी एकादशीच्या सोहळ्यादिवशी म्हणजे १२ जुलै रोजी २८ हजार ५५० वारकरी व १३ जुलै रोजी ३२ हजार २८० वारकºयांनी पंढरपुरातून प्रवास केला

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ अशी आर्त विनवणी विठुरायाला करीत पंढरीतून भाविक परतू लागले आहेत.मागील दहा दिवसात रेल्वेतून १ लाख ३१ हजार ३५३ प्रवाशांनी प्रवास केला आहे़ या प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाला १ कोटी २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी पंढरीची वारी नित्यनियमाने करतात. यंदाच्या आषाढी यात्रेला राज्यासह देशातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते. या वर्षी सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणातून भाविक पेरणीची कामे उरकून पंढरीच्या वारीला आले होते. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक समाधानी झाले. येथील प्रसाद म्हणून कुंकू, बुक्का आणि चुरमुरे तसेच देवदेवतांचे फोटो तसेच तुळशीमाळा खरेदी करून भाविक परतू लागले. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ७ ते १६ जुलै या दहा दिवसात विविध गाड्यांसह विशेष गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडल्या होत्या़ वारकºयाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या, अशीही माहिती हिरडे यांनी दिली.

दोन दिवसांत मिळाले ४८ लाखांचे उत्पन्न- आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केलेल्या नियोजनामुळे राज्यभरातून आलेल्या वारकºयांना सुखरूप प्रवास अनुभवता आला़ आषाढी एकादशीच्या सोहळ्यादिवशी म्हणजे १२ जुलै रोजी २८ हजार ५५० वारकरी व १३ जुलै रोजी ३२ हजार २८० वारकºयांनी पंढरपुरातून प्रवास केला़ या दोन दिवसात रेल्वेला ४८ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ 

३४ गाड्यांच्या झाल्या १२६ फेºया- पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी भारतातील विविध भागातून भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ प्रत्येक भाविकाची सोय व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने १६ रेल्वे गाड्यांचे नियोजन केले होते़ त्यात बहुतांश विशेष गाड्यांचाही देखील समावेश होता़ या ३४ गाड्यांनी १० दिवसात १२६ फेºया पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़

२० तिकीट चेकर, २५ आरपीएफचे जवान- प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील २५ तिकीट चेकिंग अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ शिवाय प्रवाशांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये, सुरक्षित प्रवास घडावा, यासाठी २५ आरपीएफ जवान पंढरपूर रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले होते़ 

यंदा आषाढीसाठी मध्य रेल्वेचे सोलापूर मंडलाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ३४ गाड्यांचे नियोजन केले होेते़ या विशेष गाड्यांनी १२६ फेºया केल्या़ त्यातून रेल्वेला  १ कोटी २ लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले़ पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांस जलद, सुखकर व आरामदायी प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतले़.- प्रदीप हिरडेवरिष्ठ वाणिज्य प्रबंधक,सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी