शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाखांपैकी केवळ ३४ हजार निरक्षरांची नोंद; शिक्षकांच्या असहकारामुळे ‘नव भारत साक्षरता’ दुरापास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 10:04 IST

मुंबईत केवळ हजार निरक्षर; ठरविलेले उद्दिष्ट साध्य करणे दूरच

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्र सरकारच्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत महाराष्ट्रातील १२ लाख ४० हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ३४ हजार निरक्षरांना शोधून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात यश आले आहे. या कार्यक्रमाबाबत बहुतांश शिक्षकांकडून असहकाराची भूमिका घेण्यात आल्याने ठरविलेले उद्दिष्ट साध्य करणे शालेय शिक्षण विभागाला दुरापास्त झाले आहे. मुंबईत तर अवघ्या हजार निरक्षरांचीच नोंदणी झाली आहे.

या योजनेच्या कामाला अशैक्षणिक ठरवत बहिष्कार घालून शिक्षक संघटनांनी प्रारंभीच याला विरोध केल्याने योजनेचे काम मंदावले आहे. राज्यात ऑफलाइन सर्वेक्षणाचे व काही प्रमाणात प्रशिक्षणाचेही कामकाज संघटनांनी बंद पाडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर योजना संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी आणि एससीईआरटीचे संचालक अमोल येडगे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे सर्वेक्षण, ऑनलाइन नोंदणी व टॅगिंग, प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन, जिल्हास्तरीय बैठका यांसह योजनेच्या कोणत्याही टप्प्यावरील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कारवाईबाबतचे आदेश २० ऑक्टोबरला काढले. तरीही या योजनेने जोर पकडलेला नाही.

आतापर्यंत दोन वेळा निरक्षरांच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही केंद्राने आखून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यात यश न आल्याने पुन्हा ७ नोव्हेंबरपर्यंत या कार्यक्रमाला मुतदवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या 'उल्लास' ॲपवर ३१ ऑक्टोबरपर्यंत ३३,९५० निरक्षरांची आणि २,९६० स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. त्यातही ऑनलाइन टॅगिंग (जोडणी) झालेले निरक्षर आहेत, अनुक्रमे ७,४५२ आणि १,६७२.

राज्याचे उद्दिष्ट किती?

  • राज्याला मागील व चालू वर्षाचे मिळून एकत्रित उद्दिष्ट १२ लाख ४० हजार.
  • ३१ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३३,९५० निरक्षरांची नोंदणी.
  • पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक निरक्षर. पण नोंदणीत पुणे मागे
  • सर्वात कमी निरक्षर सिंधुदुर्ग जिल्ह्यात

साक्षर कसे करणार?

फेब्रुवारी, २०२४ मध्ये निरक्षर व्यक्तींसाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’मार्फत (एनआयओएस) चाचणी घेतली जाणार आहे. राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी तयार केलेली उजास प्रवेशिका (भाग १ ते ४), उजास स्वयंसेवक मार्गदर्शिका, मूल्यांकन पत्रिका, कृतीपत्रिका, चला जाऊया गोष्टींच्या गावा, असे आनुषंगिक साहित्य दीक्षा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

काही जिल्ह्यांतील निरक्षरांची नोंदणी

  • नाशिक - ९,१६८
  • अमरावती - ५,४७४
  • वाशिम ४,११७
  • जालना - ३,९४४
  • अकोला - ३५८७
  • बीड - १,१८२
  • पालघर - ६८६
  • मुंबई शहर - ८१४
  • नागपूर - २०४
  • ठाणे - १७०
  • मुंबई उपनगर - १५६
  • रत्नागिरी - ५
  • वर्धा - ५
  • रायगड - ३
  • सिंधुदुर्ग - ३
  • यवतमाळ - २
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTeacherशिक्षकMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र