शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election 2022: "आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 00:23 IST

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही भाजपानेमहाविकास आघाडीला धक्का देत, आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. विशेष म्हणजे, भाजपला राज्यसभा निवडणुकीपेक्षाही अधिक मते विधानपरिषद निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपला राज्यसभा निवडणुकीवेळी पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. तर यावेळी तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी आणि जनतेसाठी आहे, असे म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. मात्र, मी एकच गोष्ट सांगतो, की आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आणि जनतेसाठी आहे. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्हाला कुणाची मते किती फुटलेली दिसतात, हे तुमचे कयास आहेत. या ठिकाणी जी सत्यता आहे. ती केवळ आम्हालाच माहीत आहे. सर्व पक्षातल्या त्या आमदारांचे मी आभार मानतो आणि अपक्षांचेही आभार मानतो, की त्यांनी आमचे पाचही उमेदवार निवडून आणले. 

महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही -आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते मिळवली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो. की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीय. म्हणून आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मते देतील आणि तेच येथे बघायला मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले. 

पाचव्या उमेदवराकरता आमच्याकडे एकही मत नव्हते, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मते घेतली. तसेच उरलेलेल्या चारही उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मते घेतली आणि एक प्रचंड मोठा विजय येथे झाला. यावेळी, माझे सहकारी, लक्षण जगताप आणि मुक्ता टिळक येथे आल्या आणि त्यांनी या विजयाला हात भार लावला, मी त्यांचे आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले.

या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला  -आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. मला असे वाटते, की कुठे तरी या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला आहे. राज्यात जोवर लोकाभीमुख सरकार येत नाही, तोवर आमचा संघर्ष असाच सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडी