...अन्यथा पाठिंबा काढून घेऊ- उद्धव ठाकरे
By Admin | Updated: July 25, 2016 21:19 IST2016-07-25T21:19:49+5:302016-07-25T21:19:49+5:30
शिवसेनेच्या आमदारांची कामे न झाल्यास भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा सल्लावजा इशाराच उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला दिला आहे.

...अन्यथा पाठिंबा काढून घेऊ- उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - शिवसेनेच्या आमदारांची कामे न झाल्यास भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा सल्लावजा इशाराच उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधला वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हता. अनेकदा भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. त्यानंतर फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनानिमित्त भेट दिली आणि दोन्ही पक्षांमधले वाद निवळल्याचं चित्र दिसू लागलं. मात्र आता शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री आणि आमदारांनी भाजपचे मंत्री कामं करत नसल्याची भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली.
त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मंत्र्यांना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांनाच सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा गंभीर इशारा दिला आहे. आमच्या आमदारांची कामे करा अन्यथा तुम्हाला दिलेला पाठिंबा काढून घेऊ, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी थेट भाजप नेतृत्वाला दिला आहे.