शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'... अन्यथा एसटी कर्मचारी सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 19:48 IST

दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एस.टी. कर्मचारी सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मुंबई : राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांना  4849 कोटी रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फसवी असून कर्मचार्‍यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एस.टी. कर्मचारी सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी या आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी आ.अशोक धात्रक, संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी  4849 कोटी रुपयांची ऐतिहासिक घोषणा केली. मला वाटले की एसटी कामगारांचे प्रश्न सुटले. पण मनात एक शंकाही होती कारण हे सरकार फक्त घोषणाच करते. ज्यावेळी हे सरकार ऐतिहासिक हा शब्द वापरते तेव्हा हमखास फसवणूक होणार हे जगजाहीर झालेले आहे. ऐतिहासिक कर्जमाफी फसवी निघाली, रावते यांची ४८४९ कोटी रुपयांची ऐतिहासिक घोषणादेखील घोषणाच निघाली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या वेतनवाढीबाबतची कोंडी दूर करण्यात यावी, शिवशाही एसटी भाड्याने न घेता एसटीने विकत घ्यावी, कंत्राटीकरण व खासगीकरण बंद करण्यात यावे, आकसपूर्वक कारवाया थांबवून जटील परिपत्रके रद्द करावी तसेच महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेstate transportराज्य परीवहन महामंडळ