उस्मानाबादेत दलितांना बेदम मारहाण

By Admin | Updated: August 3, 2015 00:41 IST2015-08-03T00:41:05+5:302015-08-03T00:41:05+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून शुक्रवारी रात्री एका जमावाने घरात घुसून एका कुटुंबाला लाकूड, दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

In Osmanabad, the dalits beat them severely | उस्मानाबादेत दलितांना बेदम मारहाण

उस्मानाबादेत दलितांना बेदम मारहाण

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून शुक्रवारी रात्री एका जमावाने घरात घुसून एका कुटुंबाला लाकूड, दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली़ या मारहाणीत नऊ जण जखमी झाले असून, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे़ या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध मारहाणीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या मारहाणीत निशिकांत हुंबे, कोंडाबाई मारुती हुंबे, शाहूबाई हुंबे, वनिता शत्रुघ्न हुंबे, अनिता निशिकांत हुंबे, लक्ष्मण राजाराम हुंबे, प्रवीण शत्रुघ्न हुंबे, अण्णा धर्मा वाघमारे, सुनील अण्णा वाघमारे हे जखमी झाले आहेत़ निशिकांत गंभीर असून सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले आहे़ निशिकांत हुंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अरुण माने, पोलीस पाटील राजाभाऊ पाटील यांच्यासह १५ जणांविरुद्ध बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: In Osmanabad, the dalits beat them severely