शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या मेळाव्यासाठी रेल्वेच्या विशेष १७ गाड्या, मुंबईत स्थापना दिवसाचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:37 IST

भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित होता यावे, यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

- गणेश वासनिक 

अमरावती : भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित होता यावे, यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय मंत्री, कॅबिनेट व राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींची उपस्थिती राहणार आहे. पुढील वर्षी अथवा डिसेंबरअखेर लोकसभा निवडणूक होण्याचे संकेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे. तसेच येत्या वर्षी विधानसभा निवडणुकीचे बिगूलदेखील वाजणार आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने स्थापना दिवसाचे औचित्य साधून भव्यदिव्य प्रमाणात मेळाव्याचे आयोजनामागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. तसेही काही महिन्यांपासून  शिवसेनेसोबत राजकीय वितुष्ट आल्यामुळे स्थापना दिवशी मेळाव्याच्या माध्यमातून भाजपाचे मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याची रणनिती आखली आहे. गाव, खेडी, शहर, महानगरातून भाजपच्या स्थापना दिवशी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यात भाजपाजनांनी मोठ्या संख्यने उपस्थिती दर्शवावी, यासाठी जिल्हा, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी या मेळाव्याचे ‘मार्केटिंग’ करीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भव्यदिव्य प्रमाणात स्थापना दिवसाचे आयोजन करीत असल्याचे वास्तव आहे. हा मेळावा म्हणजे विधानसभा, लोकसभा निवडणूक पूर्वीचे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे. येत्या निवडणुका स्वळावर अथवा मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवाव्यात, याचेही चिंतन, मंथन भाजपाचे नेते करणार आहे. त्यामुळे भाजपा स्थापना दिवशी मुंबई आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महत्वाच्या रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्या उपलब्ध केल्या आहेत. १७ ते १८ डब्यांची एक रेल्वे गाडी असणार असून, ५ व ६ एप्रिल या दोन दिवशी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागाचे आॅपरेटींग शाखेकडून महाप्रबंधक ब्रजेश राय यांनी ३१ मार्च २०१८ रोजी विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.        या रेल्वे स्थानकावरून सुटतील गाड्यामुंबई येथील भाजपाच्या स्थापना दिवशी राज्याच्या कानाकोप-यातून कार्यकर्त्यांना ये-जा करता यावे, यासाठी ५ व ६ एप्रिल रोजी विशेष १७ रेल्वे गाड्या सुटणार आहे. यात उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, शेगाव, मिरज, सोलापूर, भुसावळ, जळगाव, अजनी, नागपूर, बल्लारशा, वर्धा, नया अमरावती, अमरावती मॉडेल स्टेशन, अकोला, नांदगाव (मनमाड) या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.    ‘‘ मुंबईच्या बांद्रा येथील बीकेसी मैदानावर ६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या भाजपाचा स्थापना दिवस भव्यदिव्यतेने साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. नेत्यांचे मार्गदर्शन आणि येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी हा मेळावा महत्वाचा ठरणारा आहे.   - शिवराय कुळकर्णी,    प्रदेश प्रवक्ते, भाजपा

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाहRaosaheb Danweरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadakriनितिन गडकरी