शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 23:09 IST

महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आदेश दिले होते. परंतू, पावसाळा असल्याने ते शक्य नव्हते. यामुळे पावसाळ्यानंतर या निवडणुका राज्यात घेतल्या जाणार आहेत. या दृष्टीने महापालिकांची प्रभागरचना करण्यासाठी राज्यसरकारने आदेश दिले आहेत. यामधून मुंबईला मात्र वगळण्यात आले आहे. 

महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना हे आदेश देण्यात आले आहेत. अ, ब आणि क वर्गाच्या महानगरपालिकांच्या प्रभागांची पुन्हा नव्याने बहुप्रभाग रचना करण्यात येणार आहे. याला काही महिन्यांचा वेळ लागणार असला तरी त्यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना होणाऱ्या महापालिकांत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबईसह नऊ महापालिका आहेत. 

महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते. महायुती आणि मविआच्या प्रभाग रचनांच्या  राजकारणात सर्वोच्च न्यायालयाने २३६ प्रभागांवरून पुन्हा २२७ प्रभाग केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. यामुळे मुंबईसोडून इतर महापालिकांत नवीन प्रभागरचना केली जाणार आहे. फडणवीस सरकारच्या पहिल्या काळात बहुसदस्य प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली होती. तीच आता फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत असल्याने कायम ठेवण्यात आली आहे. ठाकरे सरकारने या पद्धतीला विरोध करत ती रद्द केली होती. परंतू, आता पुन्हा होणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या सत्तेत होत असल्याने राज्यात मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राबविली जाणार आहे. 

यानुसार या महापालिकांत चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. तसेच ड वर्गात जिथे चार सदस्य होणार नाहीत तिथे पाच, तीन सदस्यांची प्रभाग पद्धती अवंलबिली जाणार आहे.   

अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूरब वर्ग महानगरपालिका – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडक वर्ग महानगरपालिका – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली

ड वर्गात या महापालिकांचा समावेश...अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिका ड वर्गात मोडतात. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाPuneपुणेnagpurनागपूर