शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

राज्यातील सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ करून घेण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 11:04 IST

दहा विभाग : एक हजार ७७८ महाविद्यालयांना तत्काळ मूल्यांकन करावे लागणार

ठळक मुद्देराज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद

पुणे : राज्यातील सर्व महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षात नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट्रिडीटेशन कौन्सिलकडून (नॅक)  मूल्यांकन करून घ्यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय यांनी दिले आहेत. मात्र, राज्यातील राज्यातील दहा विभागांतील ३ हजार ४२ महाविद्यालयांपैकी केवळ १ हजार २६४ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहे. त्यामुळे उर्वरित १ हजार ७७८ महाविद्यालयांना तत्काळ नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया करावी लागणार आहे.राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील शनिवारी पार पडली. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनाबाबत चर्चा केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षात सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घ्यावे, अशा सूचना दिल्या. उच्च शिक्षणाच्या दर्जात वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन बंधनकारक केले आहे. परंतु, शासकीय महाविद्यालयांसह अनेक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.नॅक मूल्यांकन केलेल्या राज्यातील शासकीय व अनुदानित महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. राज्यात एकूण २८ शासकीय महाविद्यालये आहेत. त्यातील २३ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. मात्र, मुंबई विभागातील ३, नागपूर व औरंगाबाद विभागातील प्रत्येकी १ अशा पाच शासकीय महाविद्यालयांचे अद्याप नॅक मूल्यांकन झालेले नाही. तसेच राज्यातील १ हजार ८३७ विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी केवळ १८१ विनाअनुदानित महाविद्यालयांनी मुल्यांकन करून घेतले आहे. त्यात अमरावती, औरंगाबाद, नांदेड आणि सोलापूर या विभागांतील बोटावर मोजता येतील एवढ्या महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे.,...............अनुदानित नॅक मूल्यांकन महाविद्यालयांची विभागनिहाय आकडेवारी पुणे विभाग आघाडीवर पुणे विभागात एकूण १६८ अनुदानित महाविद्यालये असून, त्यातील १६५ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. तर ३०८ विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी ४९ महाविद्यालयांनी नॅककडून मूल्यांकन करून घेतले आहे.विभागात एकूण ४७६ महाविद्यालये असून त्यातील २१४ महाविद्यालयांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.............अमरावती विभागातील १५२ महाविद्यालयांपैकी ११८ महाविद्यालयांनी, औरंगाबाद विभागातील ११५ पैकी १०२, जळगाव विभागातील ८३ पैकी ८२, कोल्हापुरातील १३३ पैकी १३२, मुंबई विभागातील १०० पैकी ९२, नागपूर विभागातील १९५ पैकी १५४, नांदेड विभागातील ९७ पैकी ९३, पनवेल विभागातील ९४ पैकी ९२, पुणे विभागातील १६८ पैकी १६५ मूल्यांकन केले आहे. सोलापूर विभागातील ४० पैकी सर्व ४० महाविद्यालयांनी मूल्यांकन केले आहे........विभागाचे                 महाविद्यालयांची        नॅक झालेल्या नाव                              संख्या                   महाविद्यालयांची संख्या अमरावती                     २९१                           १२६औरंगाबाद                    ३८७                           १११जळगाव                       १५१                            ९४कोल्हापूर                     २२४                           १५४मुंबई                            २४२                            १२८नागपूर                        ५७०                           १६९नांदेड                          २६१                             ९१पनवेल                        ३६३                           १३०पुणे                            ४७६                           २१४सोलापूर                    ७७                              ४७                                ३,०४२                         १,२६४

 

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ