Order by court to neerav modi return 7 thousand 300 crores to punjab national bank | बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

ठळक मुद्दे कर्ज वसुली न्यायाधिकारणाने दिला निकालमोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे घेतली धाव 

पुणे: हिरा व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरनचे  पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.
मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे. 

मोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. तर मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 6 जुलै रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट होते. 


 तीनपैकी दोन दावे  निकाली :
बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा तीनशे कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा एक हजार 700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Order by court to neerav modi return 7 thousand 300 crores to punjab national bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.