शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडे शत्रू म्हणून पाहू नये - पवार

By admin | Updated: February 22, 2016 01:15 IST

राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी

पुणे : राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी तडजोड करू नये. राजकारणात विरोधकांकडे कधीही शत्रू म्हणून पाहू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.पुणे महानगरपालिकेतर्फे शरद पवार यांचा रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे अमृतमहोत्सवानिमित्त मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणातील सुसंस्कृतपणा महत्त्वाचा आहे. आम्ही संसदेत भांडतो; पण राष्ट्र आणि समाजहिताच्या प्रश्नावर सर्व जण एकत्र येतो. पुणे महापालिकेतही हे पाळले जात असल्याचे पाहिले आहे. राजकारणामध्ये लोकांशी बांधिलकी ठेवली पाहिजे. पुण्यातील राजकारणामध्ये नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, एस. एम. जोशी यांची भाषणे ऐकून आपण राजकारण आणि समाजकारण कसे करायचे याचा आदर्श घेतला. पुण्यातूनच राजकीय जीवनात प्रवेश केला. यश-अपयशातील प्रत्येक क्षणी शहराने मला प्रोत्साहित केले. त्यामुळे या सत्कारानिमित्त मी पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.‘देशामधील काही राज्यांत राजकीय सभ्यता पाहायला मिळत नाही. ही एक प्रकारची राजकीय असहिष्णुताच आहे. त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. पवारांचा कामातील उत्साह आजही कायम आहे. आमचे सरकार असले तरी त्यांचे मार्गदर्शन जरूर हवे आहे,’ असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राजकीय जीवनामध्ये विचारांची लढाई होते, पण सध्या वेगळी संस्कृती येऊ पाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होत असून, ही खरी राजकीय अस्पृश्यता आहे. बहुजन समाजातील एक नेता एवढा मोठा होतो, हा पुण्याचा आणि महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पवारांचा सर्वच क्षेत्रात वावर असून, ते आमच्यासाठी एका दीपस्तंभासारखे असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)