मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला वाचविताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर थोडक्यात बचावले.दरेकर शनिवारी धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या दौऱ्यावर गेले होते. दौरा आटोपून त्यांच्या गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना होत होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास मालेगावजवळ सवंदगाव- चंदनपुरी शिवारात एक महिला रस्ता ओलांडत होती. तिला वाचवण्यासाठी दरेकर यांच्या ताब्यातील वाहनांच्या चालकांनी ब्रेक मारले. महिला रस्त्याच्या पलीकडे निघून गेली, मात्र त्यांच्या ताफ्यातील तीनही गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अपघातातून बचावले, दौऱ्यावर असताना वाहनाला झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:46 IST