मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट देण्यास विरोध; पदाधिकाऱ्यांना अटक

By Admin | Updated: September 20, 2016 04:53 IST2016-09-20T04:53:16+5:302016-09-20T04:53:16+5:30

मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या वसईतील हॅप्पी जीवन सोसायटीच्या ९ पदाधिकाऱ्यांना माणिकपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Opposition to give flats to Muslim family; Officials arrested | मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट देण्यास विरोध; पदाधिकाऱ्यांना अटक

मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट देण्यास विरोध; पदाधिकाऱ्यांना अटक


वसई : मुस्लीम कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या वसईतील हॅप्पी जीवन सोसायटीच्या ९ पदाधिकाऱ्यांना माणिकपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. वसई कोर्टाने त्यांची संध्याकाळी जामिनावर सुटका केली.
वसईतील साई नगर परिसरातील हॅप्पी जीवन सोसायटीत विखार खान यांनी कांताबेन पटेल यांच्याकडून फ्लॅट विकत घेतला होता. मात्र सोसायटीने बैठक घेऊन फ्लॅट मुस्लीम कुटुंबाला विकण्यास विरोध केला होता. या प्रकरणी पटेल आणि खान यांनी तक्रार केल्यावर माणिकपूर पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सेक्रेटरी जितेंद्र जैन, जयश्री ढोळे, हरिश्चंद्र मांजरेकर, कल्याण वालीक, रितेश वालीक, मनीष सेठ, हर्षद राय, किरण शाह, भरत लिंबाचिया यांना अटक केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition to give flats to Muslim family; Officials arrested