शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा उताऱ्यात दुरूस्तीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 18:38 IST

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देजमिनधारक व शेतकऱ्यांना येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत या चुका दुरूस्त करून घेण्याची संधी उपलब्ध प्रकरणे ६० दिवसात निकाली काढण्याच्या सुचना काही चुक झाली असल्यास दुरूस्तीसाठी तलाठ्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करावातलाठी, तहसिलदार, मंडल अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण

पुणे : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, संगणकीकरणाच्या प्रक्रियेत नजर चुकीने काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनधारकांना व शेतकऱ्यांना येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत या चुका दुरूस्त करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.  गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या महसूल विभागाच्या यंत्रणेकडून ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू आहे. सातबारा संगणकीकरणाच्या प्रक्रियेचे चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, असे विविध टप्पे करण्यात आले आहेत. ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात तहसिलदार किंवा तत्सम अधिका-याच्या उपस्थितीत आॅनलाईन सातबारा उतारे तयार करण्यापूर्वी चावडी वाचनाचे कार्यक्रम राबविण्यात आले. त्यातून शेतक-यांकडून सुचविण्यता आलेल्या दुरूस्त्या करण्यात आल्या. त्यासाठी काही ठराविक कालावधी देण्यात आला होता. मात्र, चुकीच्या क्षेत्रफळाची नोंद किंवा सातबारा उता-यावर चुकीच्या नावाचा उल्लेख झाला असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने पुन्हा एकदा आॅनलाईन सातबारा उताऱ्यातील दुरूस्तीसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे.ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, सातबारा दुरूस्तीसाठी कालबध्द कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी तलाठी, तहसिलदार, मंडल अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही ठिकाणी एक एकर ऐवजी १० गुंठे क्षेत्र लागले असेल किंवा खातेदाराच्या नावात चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. सुनावणी घेण्याची आवश्यकता नसलेली प्रकरणे ३० दिवसात व सुनावणीची आवश्यकता असलेली प्रकरणे ६० दिवसात निकाली काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या ‘महाभुलेख’या संकेतस्थळावर जावून आॅनलाईन सातबारा उतारा प्राप्त करून घ्यावा. त्यात काही चुक झाली असल्यास दुरूस्तीसाठी तलाठ्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीdigitalडिजिटलState Governmentराज्य सरकारonlineऑनलाइन