शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाणीप्रश्नावरून विरोधक आक्रमक; सभागृहात उजनीचे पाणी पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:00 IST

कामकाज तहकूब; सोलापूर जिल्ह्यातील आमदार संतप्त

मुंबई : विदर्भ, मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. आक्रमक विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोकांनी गदारोळ केल्याने कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. शेवटी उजनी धरणाच्या पाण्याबाबत शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी विचारलेल्या प्रश्नात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्याच्या विविध भागात पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केलं असून लोकांना शंभर दीडशे किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे आणि ही वेळ लोकांवर आली ती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे, अशी टीका पवार यांनी केली. प्रणिती शिंदे, भारत भालके, राजेश टोपे यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली.वसमतमधील पन्नास गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी सकाळी व संध्याकाळी दोन तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी केली. शिवतारे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी गदारोळ केला. शेवटी गिरीश महाजन यांनीस्पष्ट केले, की उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते मध्येच अनेक भागात उचलले जाते आणि ही गोष्ट वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा दुष्काळाची स्थिती अनेक भागात गंभीर आहे आणि मराठवाड्यातील धरणात तर अर्धा टक्काही पाणी नाहीे. मात्र, विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने अखेर उपाध्यक्ष विजय औटी कामकाज १५ मिनिटांसाठीतहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाले तेव्हा उजनीच्या पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी स्वतंत्र बैठक बोलावण्याचे निर्देश त्यांनी सरकारला दिले.शिवतारे यांच्या उत्तरावर आक्षेपजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सोलापूरला पिण्याचे पाणी देण्यासाठी अर्धा टीएमसी पाणी देताना चार टीएमसी पाणी सोडावे लागते. सोलापूरला अर्धा टीएमसी पाण्याची चार आवर्तने देताना सोळा टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडावे लागते, असे स्पष्ट केले.शिवतारे यांच्या उत्तरावर पवार यांच्यासह सोलापूरच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. प्रणिती शिंदे यांनी, आधीच्या सरकारच्या काळात तीन दिवसांआड पाणी मिळायचे पण सध्या उजनी धरणात पाणी असतानाही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आणि सोलापूर महापालिकेतला मनमानी कराभार या गोष्टीला कारणीभूत आहे, अशी टीका केली.

टॅग्स :Damधरण