शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

परिचारकांच्या निलंबनावरून कामकाज ठप्प

By admin | Published: March 08, 2017 12:59 AM

सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून सलग दुस-या दिवशी सदस्यांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले.

मुंबई : सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून सलग दुस-या दिवशी सदस्यांनी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले. जोपर्यंत परिचारक यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपा वगळता सर्वपक्षीय सदस्यांनी घेतल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. दुस-या दिवशीचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्याविषयी सर्वत्र संताप आहे. त्यांच्या घरासमोर तीन हजार सैनिक आाणि त्यांचे कुटुंबीय आंदोलन करीत आहेत. अशा परिस्थितीत सभागृह सुरू ठेवल्यास बाहेर योग्य संदेश जाणार नाही. परिचारकांचे निलंबन झाल्यास सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाविषयी एकही गलिच्छ शब्द बोलण्याची कुणी हिंमत करणार नाही, असे सांगत मुंडे यांनी निलंबनाची मागणी केली. त्याला शिवसेनेच्या नीलम गो-हे, काँग्रेसचे शरद रणपिसे, भाई जगताप आदी सदस्यांनी पाठिंबा दिला. तर, परिचारक यांच्याविषयी मोठा असंतोष असताना राज्यघटनेच्या नियम १९४ अ अन्वये प्रस्ताव मांडायचा मुहूर्त बघताय का, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यावर परिचारक हे आमचे आमदार नाहीत, असे वक्तव्य सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यावर आमचा-तुमचा हा अभिनिवेश इथे आणू नका. सभागृह सदस्याने गुन्हा केलाय, हे अत्यंत ‘पारदर्शक’ आहे. त्यामुळे कारवाई तत्काळ झाली पाहिजे, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)सभागृहाची भावना लक्षात घेऊन कामकाज तहकूबया विषयामध्ये नैतिकता महत्त्वाची आहे. सदस्याचा पक्ष कोणता ही बाब गौण आहे. जवान सीमेवर रक्त सांडतात. उणे तापमानात देशाचे संरक्षण करतात. ते तिकडे उभे आहेत म्हणून आपण एसीमध्ये बसून चर्चा करतोय.परिचारक यांच्यावरील कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक काल व्हायला हवी होती, मात्र ती झाली नाही. आजही बैठक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सभागृहाची भावना लक्षात घेऊन कामकाज दिवसभरासाठी तहकूब करीत असल्याची घोेषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली.