शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

ओपन जिम रातोरात गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:53 IST

कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झाली.

ठाणे : कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झाली.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आले होते. मात्र, आमदार निधी खर्च झाल्यावर ओपन जिम बंद करून येथील रस्ता आम्ही तयारच केला नसल्याचा दावा पालिकेने केला, पण याच ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या नावाखाली तब्बल ५५ लाखांचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानाने केला. त्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ती मिळाली नाही.या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतदेखील याची चौकशी करण्याची मागणी अभियानाने केली आहे. या प्रकरणात शिंदे यांच्यासह ठाणे पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयही दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातील पुरावेच सादर केले. कांदळवनात अतिक्रमण करून पालिकेने आमदार निधीतून अण्णाभाऊ साठे उद्यान विकसित केले. त्यावर १० लाखांचा खर्च करण्यात आला. ओपन जिम विकसित करण्यात आली. त्यातील साहित्याचा खर्च ४ लाख ३१ हजारांच्या घरात गेल्याची माहिती अभियानाचे रोहित जोशी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. कोपरी पोलीस ठाण्यात पालिकेविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.यानंतरही पालिकेने आमदार निधीतून उद्यानाच्या सुशोभीकरणावर ५८.१९ लाखाच्या खर्चाला मंजुरी दिली. त्यामुळे अभियानाचे संजीव साने यांनी चौकशीची मागणी केली आहे.