शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

डीएड प्रवेशासाठी केवळ अडीच हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:00 IST

 डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १६ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे येत्या १६ जून रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार

पुणे: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून आत्तापर्यंत राज्य भरातून केवळ आडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. येत्या १६ जून रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी प्रशिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे. डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १६ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे. तसेच १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी २० जून रोजी प्रसिध्द केली होणार असून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुणवत्ता यादीवर हस्तक्षेप स्वीकारले जातील. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रवेशाची पहिली यादी २४ जून रोजी प्रसिध्द केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना २४ ते २७ जून या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. प्रवेशाची दुसरी यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून ४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत दिली जाईल. तसेच तिस-या यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात येत्या ८ ते ११ जुलै रोजी प्रवेश मिळतील. महाराष्ट्र प्रशिक्षण परिषदेने या पध्दतीने डीएड प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले असले तरी अनेक विद्यार्थी अद्याप अर्ज करू शकले नाहीत.त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असल्याचे प्रशिक्षण परिषदेच्या अधिका-यांनी सांगितले.राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ११ जून रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.तसेच डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ लागत आहे.येत्या रविवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार असून आत्तापर्यंत राज्यातील केवळ २,४३४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत.खुल्या संवर्गातील ५० टक्के आणि मागासवर्गीय संवर्गातील ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना डीएड अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात आहे.राज्यातील अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयातील हजारो जागा रिक्त राहत आहेत.त्यामुळे प्रवेश अर्ज करणा-या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळत आहे.-----------------------वर्ष         महाविद्यालय संख्या     प्रवेश क्षमता     झालेले प्रवेश २०१६-१७        ९८९        ६२,७३३        २०,२०४२०१७-१८        ९४९        ६०,२३३        १७,८७५२०१८-१९         ८४७        ५५,६४४        १७,०९२

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षक