शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

एसटी महामंडळाची नुसतीच ‘चाय पे चर्चा’ सुरू

By admin | Updated: March 14, 2017 07:39 IST

गेल्या ६0 वर्षांपासून अधिक काळ एसटी महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असतानाच कालांतराने या सेवेत बदल होणे अपेक्षित होते

सुशांत मोरे ,  मुंबईगेल्या ६0 वर्षांपासून अधिक काळ एसटी महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असतानाच कालांतराने या सेवेत बदल होणे अपेक्षित होते. मात्र, ठोस निर्णयांचा अभाव, अंमलबजावणी करण्यात होत असलेली दिरंगाई आणि कागदी घोडेच नाचवण्यात येत असल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांत तब्बल १२ विविध कार्यवाही झालेल्या नाहीत. नुसतीच ‘चाय पे चर्चा’सुरू असून त्यामुळे सुविधांपासून प्रवासी व कर्मचारी वंचित राहिले आहे. यामध्ये एसी बसेस खरेदी व भाड्याने घेण्यापासून अपघातांत जीवितहानीचे प्रमाणे कमी व्हावे यासाठी स्टीलची एसटी, कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय इत्यादींचा समावेश आहे. एसटी महामंडळापासून गेल्या चार ते पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी दुरावले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु हे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरतानाच दिसतात. गेल्या दोन ते तीन वर्षांत एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा व सेवा आणण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यातील एकाचीही आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने येत्या काही वर्षांत एसी बस वाढवण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने ५00 एसी शिवशाही बसेस भाड्याने घेतानाच १,५00 नवीन बसेसची खरेदी केली जाणार होती. अजूनही या बसेस दाखल झालेल्या नाहीत. मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय, पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह शिवशाही बसेस यांची घोषणा तर परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनीगेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात थाटामाटात केली; परंतु या सर्वांची अंमलबजावणी झालेली नाही. हीच परिस्थिती एसटीच्या अन्य प्रकल्प व प्रस्तावांचीही आहे. यामध्ये राज्यातील एसटी स्थानक व आगारांतील साफसफाईसाठी निविदा, बस स्थानके अद्ययावत करणे, आधुनिक बस पोर्ट, असे अनेक प्रस्ताव ठप्पच आहेत.उभारण्याचा निर्णय घेतला. २५ टक्के जागा या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती दिली होती. ..............................स्वच्छतेचा विसरचएसटी स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस, प्रसाधनगृहांमध्ये असलेली अस्वच्छता व दुर्गंधी, चालक-वाहकांच्या रेस्ट रूमचीही झालेली दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ स्वच्छतेला गांभीर्याने घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. याची गांभीर्याने दखल घेत आणि प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासगी संस्था किंवा कंपन्यांना काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. २0१७च्या जानेवारीपासून सर्व स्थानकांत स्वच्छतेसाठी संस्था किंवा कंपन्यांची नेमणूक केली जाणार होती; परंतु त्याचा विसर पडलेला आहे. .....अद्ययावत बस स्थानके व पोर्टएसटी स्थानके अद्ययावत करताना पोर्टही उभारण्यासाठी एसटी महामंडळाकडून दोन वर्षांत प्रयत्न करण्यात आले. एसटी स्थानकांवर ‘आधुनिक बसतळांसह व्यापारी संकुल’उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतानाच सुरुवातीला नऊ स्थानकांवर या प्रकल्पाला सुरुवात करताना त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आणि यात नऊ स्थानकांचा समावेश केला; परंतु या प्रकल्पाचे काम पुढे सरकलेले नाही. राज्यातील अन्य काही स्थानके अद्ययावतही केली जाणार होती. तेही मागे पडत गेले. .....................कंप्युटरायझेशन रखडलेएसटी महामंडळाचे संपूर्ण कंप्युटरायझेशन केले जाणार होते. १९९0 पासून हा प्रकल्प हाती घेण्यावर वारंवार निर्णय झाले; परंतु त्याची कठोर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महामंडळ अजूनही यात मागेच असल्याचे दिसते. .............................‘एसटीचा प्रवास, विनाअपघात प्रवास’ असे घोषवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी बसच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व बसेसच्या बांधणीसाठी पोलादाचा वापर केला जाईल, असे सांगण्यात आले होते. एका बसमध्ये असा प्रयोग करण्यात आला आणि त्याची कार्यशाळेत चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती महामंडळाने दिली; पण त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. १,५00 नवीन बसेस: महामंडळाकडे गेल्या दोन वर्षांत नवीन बसेस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे एसटी बसची कमतरता भासत आहे. जवळपास १,५00 नवीन बसेसची एसटी महामंडळाला गरज आहे आणि त्यासाठी महामंडळाकडून आता प्रयत्न केले जात आहेत. ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’धावत्या एसटी बसचा ठावठिकाणा समजण्यासाठी महामंडळाने सर्व बसना ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा ठावठिकाणा तसेच त्या वेळेत धावत आहेत की नाही, याची माहितीही समजेल. साध्या आणि सेमी लक्झरी बस सोडता सर्व शिवनेरी व्होल्वो बसना ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. अद्ययावत नियंत्रण कक्षएसटीचे अपघात, बसची दुरवस्था, अस्वच्छतेचा अभाव पाहता, तक्रारी व मदतीसाठी एसटी महामंडळाने २४ तास अद्ययावत नवे नियंत्रण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक वर्ष उलटले तरी नवी यंत्रणा उभी राहिलेली नाही...................