‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीला फक्त शिवसेना’

By Admin | Updated: May 1, 2016 01:03 IST2016-05-01T01:03:13+5:302016-05-01T01:03:13+5:30

संकटाच्या वेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. आता देखील दुष्काळी स्थितीत फक्त शिवसेना हा एकमेव पक्ष काम करत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे

Only Shiv Sena to help drought victims | ‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीला फक्त शिवसेना’

‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीला फक्त शिवसेना’

बीड : संकटाच्या वेळी शिवसेना मदतीला धावून आलेली आहे. आता देखील दुष्काळी स्थितीत फक्त शिवसेना हा एकमेव पक्ष काम करत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे शनिवारी केले. शिवसेनेतर्फे येथे १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम, आ. डॉ. राहुल पाटील, आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ८९ हिंदू, चार मुस्लीम व सात बौद्ध धर्मीय जोडप्यांचा त्या- त्या धर्मातील विधीनुसार विवाह झाला.
दुष्काळी स्थितीत राज्यात कोणता पक्ष काम करत असेल तर ती केवळ शिवसेना आहे, असे सांगून त्यांनी भाजपाचा नामोल्लेख टाळत टीका केली. (प्रतिनिधी)

Web Title: Only Shiv Sena to help drought victims