शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाझे आणि देशमुखांची फक्त एकदाच भेट; अनिल देशमुख यांच्या वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 06:29 IST

Sachin Waze Anil Deshmukh : सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर. वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी एकदाच भेटल्याची कबुली दिल्याचा देशमुख यांच्या वकिलाचा दावा.

ठळक मुद्देसचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर. वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी एकदाच भेटल्याची कबुली दिल्याचा देशमुख यांच्या वकिलाचा दावा.

सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी जानेवारीत एकदाच भेटल्याची कबुली दिली असून ४.७० कोटींबद्दल कसलाही उल्लेख नाही, असा दावा देशमुख यांचे वकील ॲड. कमलेश धुमरे यांनी केला आहे.ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे त्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ईडीच्या चौकशीत वाझेने बार मालकांकडून ‘नंबर वन’ व्यक्ती म्हणजे देशमुख हेच असल्याचे सांगितले जात आहे, त्याला आक्षेप घेत धुमरे यांनी याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला. ईडीने तपासाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करून ते म्हणाले, ‘आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असे सांगत नाही. त्याचा ईडी घेत असलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. सीआरपीसीमध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब स्वीकारला जात नाही. १०० कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केला.

ईडीने आरती देशमुख यांना बुधवारी समन्स दिले आहे. त्या ६६ वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहेत, त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही त्यांच्या वकिलांनी केला.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसadvocateवकिल