शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना मराठी साहित्यिक गप्प का ? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 18:55 IST

गायकांचे राग वेगळे आणि आमचे राग वेगळे, त्यांचे राग ऐकू वाटतात, पण आमचे राग परवडत नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

सांगली : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून आता चर्चा होत आहेत. मात्र मराठी भाषेअगोदर मराठी माणूस टिकला पाहिजे. जर आजची परिस्थिती निघून गेली, तर पश्चाताप करण्याशिवाय काहीही राहणार नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी औदुंबर (जि. सांगली) येथे व्यक्त केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.ते म्हणाले की, क-हाडमध्ये १९७५मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गाताई भागवत होत्या. त्यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तरीही दुर्गाताई भागवतांनी आणीबाणीवर सडेतोड टीका केली. परिस्थिती काहीही असली तरी, तुमची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबाबत साहित्यिक कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत. महाराष्ट्राचे भले करायचे असेल, तर अगोदर या राजकारणाच्या आणि जातीपातीच्या भिंती पाडायला हव्यात.केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, पण त्यांचे साहित्य आपण वाचणार नसू, तर साहित्य संमेलने भरवून काही फायदा आहे का? इतर राज्यात त्यांच्या भाषांप्रती असलेली आस्था महाराष्ट्रात दिसत नाही. दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अद्याप तो मिळाला नाही. कदाचित गुजरात भाषेला अर्ज न करताही हा दर्जा मिळू शकतो. पंतप्रधान हा देशासाठी असावा. जर पंतप्रधानांना गुजरातचा आदर असेल, तर मी महाराष्ट्राचा आदर केला तर काय बिघडले? मी माझी भूमिका घेऊनच काम करणार.सद्भावना मनापासून असावी लागते!राज ठाकरे यांनी सांगलीतील सद्भावना रॅलीचाही समाचार यावेळी घेतला. ते म्हणाले, सांगलीत म्हणे सद्भावना रॅली काढली गेली. अशा रॅल्या काढून सद्भावना निर्माण होत नसते, तर त्यासाठी सद्भावना मनातून निर्माण व्हावी लागते. संयोजकांनी मला त्यात सहभागी होण्याची विनंती केली. मी त्यांना लगेच सांगितले, माझा सहभाग तुम्हाला पेलणार नाही.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSangliसांगलीmarathiमराठी