शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

धरणांत ४० टक्केच पाणीसाठा, महाराष्ट्रात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 07:48 IST

प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गहिरे होताना दिसत आहे.

पुणे : राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठा कमी झाल्याने राज्यभरात टँकरची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी राज्यात २० मार्च रोजी २१ गावे आणि ७३ वाड्यांमध्ये २९ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर यंदा ३ हजार गावांत सुमारे ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेली असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे संकट गहिरे होताना दिसत आहे.

राज्यात यंदा पर्जयन्यमान कमी झाल्याने धरणांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नाही. त्यातच परतीचा पाऊस न झाल्याने नद्या कोरड्या पडल्या असून वाढत्या तापमानामुळे धरणांच्या साठ्यांतही झापाट्याने घट होत आहे. सध्या राज्यभरातील लहान-मोठ्या अशा दोन हजार ९९४ धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५५.८५ टक्के होता. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात असून येथील धरणांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये ४६ टक्के जलसाठा शिल्लक होता.पुणे विभागातील धरणेही आटू लागली असून गेल्या वेळच्या ७० टक्क्यांच्या तुलनेत या वेळी केवळ ४२.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिक विभागात मोठ्या प्रमाणात धरणे असूनही फक्त ४०.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या तुलनेत नागपूर, अमरावती आणि कोकणातील धरणांत अजूनही निम्मा पाणीसाठा आहे. ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार ८६० गावे आणि २०५४ वाड्यांमध्ये ९४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक ३०० गावे-वाड्यांना ३८१ टँकरने, नाशिक विभागात ९०० गाव-पाड्यांमध्ये २७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पुणे विभागात २५ मार्च रोजी २६५ गावांना तसेच १ हजार ५८७ वाड्यांना ३१० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक १४३ टँकर सातारा जिल्ह्यात असून येथे १३२ गावे व ५४० वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील ३४ गावे व ३१४ वाड्यांना ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Damधरण