शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 19:41 IST

महायुती आणि महिविकास आघाडीने आतापर्यंत किती उमेदवार जाहीर केले? पाहा...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले नाहीत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अद्याप दोन्ही गटांनी 288 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत वाद सुरुच आहे.

महाविकास आघाडीने आतापर्यंत 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर महायुतीने 215 उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जवळपास एक चतुर्थांश जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीने अद्याप 73 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर महाविकास आघाडीने 49 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

महाविकास आघाडीत जागांवाटपावरुन वादमहाविकास आघाडीने आतापर्यंत 288 पैकी 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसकडून 87, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित जागांबाबत वाद सुरू असून, यासाठी सातत्याने मविआत चर्चांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या उर्वरित उमेदवार जाहीर होऊ शकतात.

महायुतीची परिस्थितीत तशीचत्याचबरोबर महायुतीकडून 215 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक 121 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 49 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 73 जागांबाबत महायुतीत वाद सुरू असून, सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या महायुतीचीही अंतिम यादी येऊ शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती