राज्यात लाख लोकांमागे केवळ १५३ पोलीस! देशातील सर्वांत कमी प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:37 IST2017-12-12T23:37:02+5:302017-12-12T23:37:10+5:30
राज्यात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढत असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

राज्यात लाख लोकांमागे केवळ १५३ पोलीस! देशातील सर्वांत कमी प्रमाण
- राजेश निस्ताने
यवतमाळ : राज्यात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढत असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस शिपाई ते निरीक्षकांच्या वेतन पुनर्रचनेचा अहवाल नुकताच राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला. त्यात ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑातील पोलिसांचा आकडा देशात सर्वांत कमी आहे. भौगोलिक क्षेत्रफळानुसार महाराष्टÑ हे देशातील तिसºया क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तरीही येथे पोलिसांची वानवा आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पोलीस मनुष्यबळ अगदीच
तुटपुंजे आहे. सलग ड्युटी,
सततचा बंदोबस्त, आठवडी रजाही मिळत नाही, बंदोबस्ताच्या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळेच पोलिसांवरील कामाचा ताण वाढत असून, ड्युटीवर असताना मृत्यू, गंभीर आजारी होण्याचे प्रकार वाढले आहेत.
दर लाख लोकसंख्येमागे पोलीस बळ
महाराष्टÑ - १५३, मणिपूर - ९८४, नागालँड - ९३९, मिझोराम - ९१५, अरुणाचल प्रदेश - ८८०, सिक्कीम - ७५८, अंदमान-निकोबार - ७२५, त्रिपुरा - ६३७, मेघालय - ४५७, लक्षद्वीप - ३९१, दिल्ली - ३८३, चंदीगड - ३६२, गोवा - ३५४.