शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निवड श्रेणीअंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन प्रशिक्षणाचे तीन तेरा; लिंक उघडतच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:11 IST

समस्या निवारणाचे प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात निवड व वेतन श्रेणीअंतर्गत ४० हजार शिक्षकांचीऑनलाइन प्रशिक्षण यंत्रणा पहिल्याच दिवशी कोलमडली. यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंदच पूर्ण झाली नाही आणि लिंकही काम करेनाशी झाली. त्यामुळे राज्यभरातून शिक्षकवर्ग हैराण झाले. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीका केली. यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, शिक्षकांनीसुद्धा नियोजित वेळेत हजर राहून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांचे म्हणणे आहे.

या प्रशिक्षणासाठी राज्यात शेकडो, तर मुंबईत सात सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील प्रत्येक केंद्रात ५५ प्रशिक्षणार्थी आहेत.  मात्र, सर्व्हर डाउन झाल्याने अनेकांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे २ ते १२ जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी चारऐवजी दोनच धडे शिकवले गेले.  मात्र, नियोजनाअभावी हजारो शिक्षकांचा वेळ वाया गेला, अशी तक्रार आता करण्यात येत आहे. मात्र, प्रशिक्षणासाठी वेळेत येऊन शिक्षकांनी सहकार्य करायला हवे. सकाळी ९:१५ वाजता वेळेत हजर राहणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान उच्च प्राथमिकचे शिक्षक माध्यमिकला, तर माध्यमिकचे शिक्षक उच्च प्राथमिक गटात निवडले गेले. त्यामुळे अनेकांना या प्रशिक्षणानंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.-ज. मो. अभ्यंकर, शिक्षक आमदार

सुट्ट्या लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन व्हायला हवे होते. मात्र, तांत्रिक समस्येमुळे शिक्षक, प्रशिक्षक सर्वांनाच मनस्ताप झाला.-महेंद्र गणपुले, मुख्याध्यापक संघटना

तांत्रिक समस्या सोडविण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच ही समस्या दूर होऊन प्रशिक्षण सुरळीत होईल. शिक्षकांनी देखील वेळेचे पालन आणि सहकार्य करणे जरुरी आहे.-राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन