शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राज्यात १ मे पासून आॅनलाइन साताबारा : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:36 IST

आता १ मे पासून आॅनलाईन साताबारा मिळणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे़.

ठळक मुद्दे ४०,७७८ गावांमध्ये प्रक्रिया पूर्ण

पुणे : राज्यातील ४३ हजार ९४८ महसूली गावांपैकी ४० हजार ७७८ गावांमध्ये ७/१२ आॅनलाइन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ३००० गावातील संगणकीकरणाचे काम बाकी असून एप्रिल अखेर काम पूर्ण होवून १ मे पासून राज्यात संगणकीकृत सातबारा मिळणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पुणे जिल्हा परिषदेत मुद्रांक विभागाने २६ हजार ५00 कोटींचा महसूल वसूल केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नोंदणी मुद्रांक आयुक्त अनिल कवडे, जमाबंदी आयुक्त एस़ चोक्कलिंगम, सांगलीचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद कराड आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, आतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा आॅनलाइन मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया खोळंबत राहिली. आता १ मे पासून आॅनलाईन साताबारा मिळणार असून  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना, उस्मानाबाद, गोंदिया, नागपूर, आणि भंडारा जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. तर १९ जिल्ह्यामध्ये ९० टक्केपेक्षा अधिक काम झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्हा ५५ टक्के , सातारा ५०.२६ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९.९७ टक्के सातबारा आॅनलाइन झाले आहेत. सर्वांत कमी कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा १७.९७ आणि रत्नागिरीमध्ये केवळ ११.७६ टक्के काम पूर्ण झाले आहे़.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलonlineऑनलाइन