शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:33 IST

मोबाइलवरील ऑनलाइन गेमच्या आहारी तरुणाई

लोकमत न्यूज नेटवर्कपारनेर (जि. अहिल्यानगर)  : पारनेर तालुक्यातील एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या विळख्यात अडकल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांत अधिकृत काहीही नोंद नाही. त्याच्या मित्रानेही ऑनलाइन गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.  

सदर तरुण हा बारावी उत्तीर्ण झाला होता. तो अहिल्यानगर शहरात मित्रांसोबत खोलीवर राहत होता. मित्रांबरोबर राहून शिक्षण घेत असताना तो ऑनलाइन गेमच्या जाळ्यात फसला. आपले शिक्षण पूर्ण करून गावाकडे आला असतानाही ऑनलाइन गेम त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. चार दिवसांपूर्वी घरातील आई-वडिलांसह इतर सदस्य शेती कामासाठी गेले असताना घरी गळफास घेतला. या तरुणाच्या आणखी एका मित्रानेही काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, पालकांनी याबाबत पोलिसांत काहीही माहिती दिलेली नसल्याने अधिकृतपणे यावर कुणीही शिक्कामोर्तब केले नाही.

खामगाव (जि. बुलढाणा) : राज्यातील युवकांचे वर्तन दिवसेंदिवस अधिकच बिघडत असल्याचे चिंताजनक वास्तव पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत राज्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या ५,२०८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील ३,५७३ युवकांचा समावेश आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यातील विविध पोलिस विभागांकडून अमली पदार्थांचे सेवन, बेकायदेशीर जमावबंदीचे उल्लंघन, आदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत असून, काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी